मुंबईत माथेफिरूचा शेजाऱ्यावर हल्ला, चार जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
आरोपीची पत्नी आणि मुले दोन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेले होते. आपल्या बायको आणि मुलाला शेजाऱ्यांनीच भडकवल्याचा आरोपीला संशय होता. तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - मुंबईत एका धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रँट रोड येथे एका ५४ वर्षीय माथेफिरूने एकाच वेळी पाच जणांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ग्रँट रोड येथील पार्वती मॅन्शन इमारतीत दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. दरम्यान, हा जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तात्काळ अटक केली.
जयेंद्रभाई मिस्त्री, (वय 77 वर्ष), इलाबाई मिस्त्री, (वय 70 वर्ष), जेनिल ब्रह्मभट्ट, (वय 18 वर्ष), स्नेहल ब्रह्मभट्ट, (वय 44 वर्षे) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे असून, प्रकाश वाघमारे, (वय 53 वर्षे) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, ‘ही घटना दुपारी 3.30 वाजता घडली. आम्हाला माहिती मिळाली की एक व्यक्ती हातात चाकू घेऊन इमारतीमध्ये अनेक लोकांवर हल्ला करत आहे. त्यानंतर आमची टीम तत्काळ तिथे पोहोचली. मात्र, तोपर्यंत आरोपीने 5 जणांवर हल्ला करून स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होते. खूप प्रयत्नांनंतर आम्ही त्याला पकडलं आहे. सध्या या हल्ल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे.’
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, पुढे सांगितलं की, या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, चेतन गाला असे त्याचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचे कुटुंबीय त्याला सोडून गेले होते. यामुळे तो मागील अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. शेजाऱ्यांमुळेच घरच्यांनी आपल्याला सोडून गेल्याचा संशय आरोपीला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी चेतन याने हा भयंकर हल्ला केला.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ग्रँट रोडवरील पार्वती मॅन्शनमध्ये दुपारी साडेतीन वाजता ही भीषण घटना घडली. आरोपीची पत्नी आणि मुले दोन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेले होते. आपल्या बायको आणि मुलाला शेजाऱ्यांनीच भडकवल्याचा आरोपीला संशय होता. तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्यानंतर शुक्रवारी शेजाऱ्यांना पाहताच त्याने त्याच्या घरी जाऊन चाकू उचलला आणि शेजारच्या कुटुंबातील पाच जणांवर हल्ला केला. या प्रकरणी आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.