केतकीच्या समर्थनार्थ तृप्ती देसाई पाठोपाठ सदाभाऊ खोत मैदानात उतरले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
उस्मानाबाद, दि. 16 मे – सगळा महाराष्ट्र केतकी चितळेच्या वर्तणुकीचा निषेध करत असताना आता हळु हळु तिच्या समर्थनार्थ एक-एक जण पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई हिने केतकीला ट्रोल करणाऱ्यांना उपदेशाचे डोस पाजले होते. तर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत केतकीचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे.
सदाभाऊंनी म्हटले आहे की, 'मला वाटतं केतकी चितळे कणखर आहे, तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रात तिला कुणाची गरज नाहीए. तिला मानावं लागेल की, उच्च न्यायालयात वकील न देता बिचारीने स्वत:ची बाजू स्वत: मांडली.' असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका केली आहे.
हा (अमोल मिटकरी) भाषणामध्ये ब्राम्हण समाजाला टार्गेट करतो खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे घसरलेली होती? आणि आजच कुठे तुमची नैतिकता उफळून आली. देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना तुमच्या जिभेला हाड नव्हतं? तेव्हा तुम्हाला थोर-मोठ्यांचा अपमान करु नये असं वाटत नव्हतं का?'
मला वाटतं केतकी चितळे कणखर आहे, तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रात तिला कुणाची गरज नाहीए. तिला मानावं लागेल. की, उच्च न्यायालयात वकील न देता बिचारीने स्वत:ची बाजू स्वत: मांडली. ज्या वेळी तिने ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांची टीका-टिप्पणी बघा. त्यांच्या कमेंट बघा. काय कमेंट आहेत तुमच्या.'
'म्हणजे तुम्ही केलं तर पाटलाच्या पोराने केलं आणि दुसऱ्यानं केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. प्रत्येकाला स्वाभिमान आहे.' 'प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केलेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो आमचा लढा हा वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्हाला वाडे पाडायचे आहेत.' अशी टीका देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.
सदाभाऊ खोत यांची ही कृती आगीत तेल ओतणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता काय करणार हे पाहावे लागेल.