दवाखान्यासमोर लावलेला ट्रक काढण्यास सांगितल्याने डॉक्टरला बेदम मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दवाखान्यासमोर लावलेला ट्रक काढण्यास सांगितल्याने डॉक्टरला बेदम मारहाण

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -     दवाखान्यासमोर लावलेला ट्रक काढण्यास सांगितल्याने तिघांनी मिळून दवाखान्याची तोडफोड करत डॉक्टरला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नॅशनल पॉलिक्लिनिक समोर  कुदळवाडी, चिखली येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उमेश काशिप्रसाद यादव (वय 34, चिखली प्राधिकरण), मुकेश सुरेश जाधव (वय 32, रा. कासारवाडी, पुणे), राजेश्वर हरीपाल यादव (वय 21, रा. कासारवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. फुरकान अहमद काझी (वय 30, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुदळवाडी येथे क्लिनिक आहे. त्यांच्या क्लिनिक समोर आरोपी उमेश याने त्याचा ट्रक पार्क केला. तो ट्रक बाजूला घेण्यास फिर्यादी यांनी सांगितले. त्यावर 'तू कोण लागून गेला माझी गाडी काढण्यास सांगणारा' अशी त्याने धमकी दिली. फिर्यादी यांनी ट्रकच्या चाकातील हवा सोडतो असे म्हटले असता आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून क्लिनिकचा बोर्ड तोडून फेकून दिला. लाकडी दांडक्याने पायावर मारून फिर्यादीस जखमी केले. फिर्यादी घाबरून क्लिनिकमध्ये दरवाजा बंद करून बसले असता आरोपींनी दरवाजा तोडून फिर्यादीस आत जाऊन मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.