प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराला राजमहिला परिधान करतील 'या' रंगाचे वस्त्र ! कारण आहे...

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराला राजमहिला परिधान करतील 'या' रंगाचे वस्त्र ! कारण आहे...
नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप अर्थात  'ड्यूक ऑफ एडिनबर्ग' यांचे शुक्रवारी निधन झाले होते. शनिवारी (17 एप्रिल) दुपारी 3 वाजता सेंट जॉर्ज चॅपल विंडसरमध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.  तत्पूर्वी रॉयल फॅमिलीच्या जुन्या परंपरेनुसार दिवंगत प्रिन्स फिलिप यांना श्रद्धांजली वाहिली जाईल. या प्रसंगी राजघराण्यातील स्त्रिया कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करतील, याबाबत जाणून घेणे खूप रोचक ठरेल. या परंपरेचे शिष्टाचार कोणते, याचा इतिहास काय, या बाबीही जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. 
ब्रिटनच्या राजघराण्याच्या जुन्या परंपरेनुसार या प्रसंगी राजघराण्यातील स्त्रिया काय परिधान करतील याचे संकेतही आहेत. अशा प्रसंगी येणार्‍या रॉयल महिला, द क्वीन, द डचेस ऑफ कॉर्नवॉल, डचेस ऑफ केंब्रिज, काउन्टेस ऑफ वेसेक्स, राजकुमारी बीट्रिस, युजेनी आणि काळ्या रंगाचे घट्ट कपडे परिधान करतील. या वेळी आणखी एक ऍक्सेसरी  खूप महत्वाची आहे जी आहे, हेड कॅप. ड्यूकच्या अंत्यसंस्कारास हजर असलेल्या सर्व रॉयल लेडीज हेड कॅप्स परिधान केल्या पाहिजेत, असा नियम आहे. 
ख्रिसमस, वाढदिवसाच्या आणि लग्नासारख्या फंक्शन्समध्ये केट मिडल्टन आणि मेघन मार्कल बहुतेक वेळा हेडकॅप्स परिधान करताना दिसतात. कारण राजेशाही स्त्रियांना सर्व शाही समारोहात टोपी घालण्याची आवश्यकता असते.  बस्टलच्या म्हणण्यानुसार हे शिष्टाचार नियम १९५० च्या दशकापासून लागू आहेत, कारण कोणत्याही शाही कार्यक्रमाप्रसंगी रॉयल घराण्यातील आणि उच्चभ्रू महिलांचे केस दाखविणे अशुभ मानले जाते.
प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावणाऱ्या सर्व राज स्त्रियांना या परंपरेनुसार पोशाख करावा लागेल, परंतु त्या कुटुंबातील एका सदस्याला वेगळा पोशाख घालण्याची मुभा मिळू शकेल. ती म्हणजे प्रिन्स फिलिप यांची एकुलती एक मुलगी राजकन्या अ‍ॅनी.  परंपरेनुसार, ती तिच्या लष्करी गणवेशात या प्रसंगी दिसू शकते, कारण १९ व्या शतकापासून रॉयल व्यक्ती विविध राजकीय प्रसंगी लष्करी पोशाख परिधान करतात.
सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरस प्रतिबंधामुळे बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर जनताही एकत्रित होणार नाही आणि कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही. अंत्यसंस्कार बीबीसीवर प्रसारित केले जातील आणि एक मिनिट शांतता ठेवली जाईल.  ड्यूकच्या अंत्यसंस्कारास फक्त 30 लोक उपस्थित राहतील, ज्यात प्रिन्स फिलिपची मुले, नातवंडे आणि कुटुंबातील इतर जवळचे सदस्य असतील.