पुणे पोलीस आयुक्तांची धडक कारवाई; आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे पोलीस आयुक्तांची धडक कारवाई; आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 7 जणांचे निलंबन

  पुणे , (प्रबोधन न्यूज )  -   दर्शना पवार हत्या प्रकरण आणि सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन करण्यात आलं आहे. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आलं आहे.

कामामध्ये हलगर्जीपणा करणार्‍या तसेच कर्तव्य न पार पाडणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना पुणे पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलीस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलीस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलीस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोलीस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलीस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आलं आहे. योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकानं बंद केली नाहीत, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे या सगळ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. 

दोन दिवसांपूर्वी सात जणांचं निलंबन

यापूर्वी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आलं होतं. यापूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी बाकी सगळ्या पोलिसांची चौकशी केली त्यानंतर आणखी सात जणांवर कारवाई केली आहे.

यापूर्वी सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे, समीर विठ्ठल शेंडे, हसन मकबुल मुलाणी, मारुती गोविंद वाघमारे, संदीप जयराम पोटकुले आणि विनायक दत्तात्रय जांभळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. 

पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; पोलिसांनाही कडक सूचना...

पुण्यात वाढती गुन्हेगारी पाहता अनेक पुणेकरांनी पुणे पोलीस नक्की काय करत आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदाशिव पेठेत झालेल्या हल्ल्यानंतर पेरुगेट पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांवर देखील कारवाई होणार आहे. दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.