पहिल्या तिमाहीतच कर वसूलीचा उच्चांक... उच्चांक आणि उच्चांक...
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने पालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच दमदार अशी कामगिरी केली आहे. विभागाने अवघ्या 90 दिवसांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 447 कोटी रुपयांचा कर वसूल करून महापालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. तर प्रामाणिकपणे कर भरुन शहरविकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच 447 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
6 लाख 2 हजार 203 मालमत्ता धारकांना पैकी 3 लाख 3 हजार 350 मालमत्ता धारकांनी म्हणजे पन्नास टक्के मालमत्ता धारकांनी तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी 447 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.
'वृध्दीकडे नेणारा प्रकल्प सिद्धी'
पालिकेने यंदा मालमत्ता करांची बिले वाटप महिला बचत गटांतील महिलांना देण्याचे ठरवले. याला प्रकल्प सिद्धी असे नाव देण्यात आले. हा निर्णय पालिकेसाठी खरोखर 'सिद्धिकडून वृध्दिकडे' नेणारा ठरला. जवळपास चारशे महिलांनी निव्वळ चाळीस दिवसात उन्हातान्हाची पर्वा न करता शंभर टक्के बिलाचे वाटप केले. यंदा नागरिकांना वेळेत बिले मिळाल्यामुळे नागरिकांनी 30 जून पर्यंत असलेल्या सवलतींचा फायदा घेतला आहे. त्यामुळे महिला बचत गट नावीन्यपूर्ण स्वरूपाचे काम पण करू शकतो असा संदेश गेला. या महिलांसाठी हा एक नवा अनुभव असला तरी त्यांनी यात यशस्वी सहभाग नोंदवला आहे. त्यांनी बिले वाटप करताना संकलित केलेल्या माहितीचा आता पालिकेला दीर्घ काळ फायदा होणार आहे. यातून बचत गट महिलांना अजून वेगवेगळ्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आकडे बोलतात
तीन महिन्यांत वसूल झालेला कर संकलनाचा वाढता आलेख
वर्ष. करदात्यांची संख्या रक्कम
2020-21 : 1,15,851 : 148 कोटी
2021-22 : 1,39,649 : 171 कोटी
2022-23 : 1,96,839 : 253 कोटी
2023-24 : 303350 : 447 कोटी
30 जून 2023 ठरला 'विक्रमी दिवस'
नेहमी वर्षाअखेर 31 मार्च रोजी सर्वाधिक कराचा भरणा होत असतो. यंदा मात्र 30 जूनला सर्वच कर संकलन विभागीय कार्यालयात मालमत्ता धारकांची तुफान गर्दी होती. 30 जूनला यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले गेले. या एकाच दिवसात तब्बल 14 हजार 620 नागरिकांनी तब्बल 30 कोटी 85 लाख रुपयांचा भरणा केला. त्यात 21 कोटी निव्वळ ऑनलाईन भरणा आहे.
वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगावमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या अधिक
कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 600, सांगवीमध्ये 34 हजार 694, चिंचवडमध्ये 29 हजार 303 थेरगावमध्ये 28 हजार 368 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 4 हजार 131 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.
अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसुलीचे टार्गेट
तीन महिन्यांत 50 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्षातील 9 महिन्यात उर्वरित 50 टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर 100 टक्के वसुली करणे हेच विभागाचे एकमेव ध्येय असणार आहे.
कर संकलन विभागाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्या नागरिकांना आहे. त्याबद्दल या सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. हा सर्व कररुपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया राहील याची मी ग्वाही देतो. या शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील यावर वैयक्तिक लक्ष देईल असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मत व्यक्त केले .
गत वर्षीपासून आम्ही राबवत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमाचे हे सांघिक यश आहे. हे करत असताना आम्हाला काही जप्तीसारख्या अप्रिय कारवाया कराव्या लागल्या असल्या तरी त्यामागे शहराच्या विकासाचे सूत्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यातून हे शहर अधिक सर्वांगसुंदर, राहण्यासाठी सुखद होईल याची दक्षता घेतली जाईल, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांब ळे यांनी सांगितले .
माहितीचे शुध्दीकरण, बीलांचे वेळेवर वाटप यासाठी आमचा प्रकल्प सिद्धी एक मैलाचा दगड ठरला आहे. "सिद्धीकडून वृद्धिकडे" ही टॅगलाईन बचत गटांच्या महिलांनी अक्षरशः खरी करून दाखवली. कर संकलन विभाग त्यांचा शतशः आभार आहे. या प्रकल्पाला आम्ही भविष्यात अजून उंचीवर नेणार आहोत. माहिती विश्लेषण, त्यावर सर्जनशील आकर्षक जनजागृती यासाठी फॉक्सबेरी यंत्रणेची आम्हाला भरीव मदत झाली आहे. शेवटी आमच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी मोलाची ठरली आहे. विभागातील कार्यक्षम कर्मचारी अधिकारी यांचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी एक भाग्ययोग आहे असे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले .