निगडी येथील भुयारी मार्ग काम अर्धवट ठेवल्यामुळे अपघाताची मालिका सुरु महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

निगडी येथील भुयारी मार्ग काम अर्धवट ठेवल्यामुळे अपघाताची मालिका सुरु महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

         पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -       निगडी येथील मधुकर पवळे उड्डाण पूल व भक्ती शक्ती उड्डाण पूल ह्या दोघांच्या मध्ये भुयारी मार्ग काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या कडून सुरू असून त्या भुयारी मार्ग काम मुदत संपली असून त्या भुयारी मार्ग काम करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी मुदतवाढ देण्यात आली असून सुद्धा भुयारी मार्ग काम अर्धवट ठेवल्यामुळे अपघाताची मालिका सुरु आहे. निगडी येथील भुयारी मार्ग काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका प्रशासनाने दिशादर्शक फलक लावावा  अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाला केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,  निगडी येथील भुयारी मार्ग काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्याने तसेच गतीरोधक मोठे बसविण्यात आले असून त्या मुळे अपघात होत असून काल रात्री ११ वाजता टू व्हीलर धारक गाडीवाला मरण पावला असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती तसेच भुयारी मार्ग काम ज्या ठेकेदार ह्यांना देण्यात आले आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती दिनांक १५/७/२०२३ रोजी भक्ती शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल ह्या ठिकाणी भुयारी मार्ग काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.