मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रीपद मिळावे; रामदास आठवले यांची मागणी

मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रीपद मिळावे; रामदास आठवले यांची मागणी

   मुंबई , (प्रबोधन न्यूज )   -   भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्र पक्षांची मुंबईत बैठक झाली असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच जागा वाटपात विधानपरिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला असल्याची माहिती आठले यांनी दिली. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र जिथे दलित वस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, "भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी."