निगडी भक्ती-शक्ती पुलाजवळ एलपीजी गॅसचा टँकर उलटला खबरदारी म्हणून 300 मीटरचा परिसर बंद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

निगडी भक्ती-शक्ती पुलाजवळ एलपीजी गॅसचा टँकर उलटला  खबरदारी म्हणून 300 मीटरचा परिसर बंद

    पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  निगडी येथील भक्ती-शक्ती पुलाच्या जवळ एसबीआय बँकेच्या समोर मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणारा  भारत पेट्रोलियम गॅसचा टँकर आज (रविवारी) पहाटे तीनच्या सुमारास उलटला आहे. यामुळे परिसरात गॅस पसरून धोका होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून अग्निशमनदल व पोलिसांनी घटनास्थळी जात जवळपासचा 300 मीटर पर्यंतचा परिसर पुर्णपणे बंद केला आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  या अपघातात टँकरचा चालक गंभीर जखमी असून त्याला त्वरीत पुढील उपचारासाठी दवाखान्यात हलवले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या, भारत पेट्रोलियमची टीम, निगडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन चे पथक दाखल झाले आहे. जो लिक्वीड गॅस रस्त्यावर सांडला होता त्यावर त्वरीत अग्निशमन दलाने पाणी टाकले आहे. तसेच दुसरा टॅकर मागवून मशीनद्वारे गॅस त्यात भरला जात आहे.

खबरदारी म्हणून 300 मीटर पर्यंत म्हणजे पुना गेट ते पवळे पुलापर्यंत सर्व परिसर , वाहतूक बंद कऱण्यात आली आहे. दुकाने बंद असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिली आहे. दहा पर्यंत गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरला जाईल तेंव्हा सर्व दळणवळण पुर्ववत होईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीत हानी यात झाली नसून धोका तुर्तास टळला आहे