मविआचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी निवडणुकीत भाजपला धूळ चारणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. ५ मे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी, (दिनांक ४ मे रोजी) निर्णय घेतला. येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे सर्वच पक्ष आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार अशी चिन्ह दिसत आहेत. बुधवारी मुंबई येथील वाय.बी.चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली.
यावेळी पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूका लढवाव्या, असा आदेश पवार यांनी दिला, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
आव्हाड यांनी सांगितले की, पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीत असलेल्या तिन्ही पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून ही निवडणूक लढवावी, असा आदेश शरद पवार यांनी या बैठकीत दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी चर्चा केली. ते म्हणाले की, आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबत आणि खासदार, मंत्री, आमदार यांना स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी एकत्र कसे येईल, यावर चर्चा झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय घेतील, असे पाटलांनी स्पष्ट केले.
मात्र अशातच काँग्रेसमधून एक मोठी माहिती पुढे येत असून यातून काँग्रेसने आपली वेगळी वाट निवडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईमध्ये नुकतीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एक गुप्त बैठक पार पडली असल्याची बातमी एका वृत्तपत्राने प्रकाशित केली आहे. आगामी मुंबई आणि राज्यातील इतर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यातही विशेष म्हणजे, प्रकाश आंबेडकर यांची लवकरच काँग्रेसमधील बड्या नेत्यांसह बैठक होण्याची शक्यताही या वृत्तामध्ये वर्तवली आहे.
भाजपनेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात एनडीएमधून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र नव निर्माण सेनेला सोबत घेण्याचा विचार चालू आहे. राज ठाकरे यांनी सध्या हाती घेतलेला मशिदींवरच्या बेकायदा लाउडस्पीकरचा मुद्दा दिल्लीपर्यंत गाजतो आहे. त्यांची शैली आणि त्यांच्याकडे गर्दी खेचण्याचे असलेले कसब पाहता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच मनसेला ‘एनडीए’शी जोडून घेण्यासाठी भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व आग्रही आहे. मात्र, राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीयांच्या मतांचा किती फटका बसू शकतो, याचाही सर्व्हे करण्यात येत आहे.