शेतात दारुच्या बाटल्या टाकल्याचा जाब विचारल्याने शेतकऱ्याला मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शेतात दारुच्या बाटल्या टाकल्याचा जाब विचारल्याने शेतकऱ्याला मारहाण
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - शेतात काचेच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या का टाकल्या असे शेतकऱ्याने विचारले असता, त्याचा राग येवून तिघांनी लाकूड व कोयत्याने मारहाण केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.19) सकाळी सांगुर्डी खेड येथे घडला आहे.
चंद्रकांत मारुती भसे (वय 55 रा.सांगुर्डी, खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन सुनिल भसे (वय 22), अनिल लक्ष्मण भसे (वय 46), अजित हिरामण भसे (वय 30, सर्व रा.सांगुर्डी,खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोयता घेऊन शेतात शेळ्यांसाठी गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शेतात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या पाहिल्या. फिर्यादी यांनी शेतात दारुच्या बाटल्या का टाकता असा जाब आरोपींना विचारला. याचा राग येवून आरोपींनी तेथे पडलेले लाकूड तसेच फिर्यादीच्या हातातला कोयता हिसकावून घेत शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.