लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जुंपली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जुंपली

 पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -   लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाने शेजाऱ्याच्या घरात जाऊन तोडफोड करून महिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. शेजाऱ्याला रस्त्यात गाठून कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी काळाखडक, वाकड आणि ताथवडे येथील रिक्षा थांब्यावर घडली.

गणेश श्रीरंग वाघमारे (वय 36, रा. काळाखडक, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय 28, रा. काळाखडक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून सोमवारी सायंकाळी आरोपीने फिर्यादी घरी नसताना त्यांच्या घरात जाऊन फिर्यादी यांच्या पत्नी आणि आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फ्रीजचा दरवाजा तोडून नुकसान केले. घरातील एखाद्याला तरी संपवून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर मंगळवारी दुपारी फिर्यादी हे ताथवडे येथील रिक्षा थांब्यावर असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला मारण्यासाठी कोयता काढला. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत पसरली. त्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. मात्र तो वार फिर्यादी यांनी हुकवला आणि घटनास्थळावरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.