व्यावसायिकाचे दीड लाखांचे साहित्य चोरीला

व्यावसायिकाचे दीड लाखांचे साहित्य चोरीला

    सोमाटणे (प्रबोधन न्यूज ) -   सोमाटणे फाटा येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे  दीड लाखांचे  स्टील चे साहित्य चोरीला गेले आहे. ही चोरी   5 ते 6 जून दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी निखिल मनोज मेहता ( वय.27 रा. तळेगाव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे 2.5 टन वजनाचे  सुमारे 1 लाख 53 हजार रुपयांचे स्टील साहित्य आरोपीने चोरून नेले आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.