गुंतवलेल्या रकमेवर 30 टक्के परतावा देतो म्हणत 49 लाखांचा गंडा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गुंतवलेल्या रकमेवर 30 टक्के परतावा देतो म्हणत 49 लाखांचा गंडा

     पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) -   गुंतवलेल्या रकमेवर 30 टक्के परतावा देतो असे आमिष दाखवून आयटी अभियंत्याची 49 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडी येथे उघडकीस आला आहे. ही घटना 28 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत घडली असून दोन महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 स्नेहासिंग हृदयनारायण सिंग (वय 35, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अधुरी गांगुली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना व्हाट्सअप वरून लिंक पाठवली. आरोपीकडे पार्ट टाइम जॉब असून सुरुवातीला युट्युब वरील व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. त्या टास्कचे आरोपीने फिर्यादी यांना 150 आणि 350 रुपये दिले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे मोठ्या रकमेचे टास्क असून तीन टास्क पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात 30 टक्के नफ्यासह गुंतवलेली रक्कम पाठवली जाईल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी तीन टास्क मध्ये एकूण 49 लाख रुपये गुंतवले. मात्र त्यांनतर आरोपीने फिर्यादीला कोणताही नफा अथवा त्यांनी गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.