सांगवीतील लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम व भारतीय विद्यानिकेतनची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या देवेंद्र काशिद याने 89.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, पिंकी सुथार हिने 88.80 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सुरेश सुथार याने 87.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. ओम खर्चे याने 87.40 टक्के गुण मिळवत चौथा आणि रेवती आचार्य हिने 85.80 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या वरद कोलप याने 89.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती चव्हाण हिने 88 टक्के गुण मिळवत द्वितीय, तर मयुरेश भगत याने 83.20 टक्के गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.