अॅटो क्लस्टर येथे औद्योगिक प्रदर्शनाचे उद् घाटन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अॅटो क्लस्टर येथे औद्योगिक प्रदर्शनाचे उद् घाटन

पिंपरी, पुणे (दि. २० एप्रिल २०२२) गिअर टेक्नॉलॉजी, मॅकेनीकल पावर ट्रान्समिशन, ग्राईंडेक्स टेक्नॉलॉजी आणि सरफेस फिनिशिंग प्रोसेस यातील नव तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना याबाबत एकत्रित माहिती देणारे तीन दिवसांचे इपटेक्स २२ आणि ग्राईंडेक्स या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. २१ एप्रिल) सकाळी १० वाजता चिंचवड येथील ऑटोक्लस्टर प्रदर्शन हॉल येथे करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून याचा समारोप शनिवारी (दि. २३ एप्रिल) रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

 तीन वर्षांनी होणा-या या प्रदर्शनात गिअर आणि ग्राईंडेक्सशी संबंधित ४५ हून जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात नवनविन प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादक, वितरक आणि अभियंत्यांचा योग्य समन्वय साधला जाणार आहे. इपटेक्सचे सातवे आणि ग्राईंडेक्सचे पाचवे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात ४७ पेक्षा जास्त विविध उत्पादन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटी देऊन आपल्या उद्योगांचा आलेख उंचावला आहे. ग्राईंडेक्स टेक्नॉलॉजी आणि सरफेस फिनिशिंग प्रोसेसची सर्व माहिती एकाच छताखाली देणारे भारतातील हे एकमेव प्रदर्शन आहे. ह्या प्रदर्शनातून मेड इन इंडीयाच्या ध्येय धोरणांना चालना मिळणार आहे. या प्रदर्शनास औद्योगिक क्षेत्रात काम करणा-या कामगार, अभियंते, कंपनी प्रतिनिधी, वितरक, उत्पादन, सेवा देणा-या कंपन्यांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.