संभाजीनगरमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ

छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर शहरात प्रथमच दोन गटात वाद आणि जाळपोळीची घटना घडली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

संभाजीनगरमध्ये दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मार्च - शहरातील किराडपुरा भागात दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून आठ ते दहा गाड्या जाळण्यात आल्या आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना रात्री ११.३० ते १२ वाजता दरम्यान घडली. आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सांगितले आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला असून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितलं आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून यानंतर रात्री किराडपुरा, राममंदिर, रोशनगेट, बुढीलेन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शहरातील किराडपुरा भागात राममंदिरात (Kiradpura Rammandir) रामनवमीची तयारी सुरु होती. तयारीसाठी जमा झालेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसऱ्यागटासोबत वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे हिंसाचार वाढला. पोलिसांची अधिक कुमक बोलावण्यात आली. तोपर्यंत जमावाने पोलिसांची वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ केली होती. रात्री ११.३० वाजता सुरु झालेला हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी शहरात दंगल घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची सूचना संबंधीत यंत्रणांना दिली होती. यासंबंधी त्यांनी माध्यमांनाही माहिती दिली होती. शहरात दंगल घडवून आणण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही बघायला मिळाले. दरम्यान, संभाजीनगर येथील घटना दुर्दैवी आहे, आता संभाजीनगर येथील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच तणाव निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये. सर्वांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.