भिंतीच्या वरच्या बाजूलाच एसी का बसवला जातो ? जाणून घ्या खरे कारण !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे - एसी असलेली खोली उन्हाळ्यात खूप आरामदायक असते. एसी आपल्याला केवळ बाहेरच्या उष्णतेपासून आराम देत नाही तर शरीराला अति तापण्यापासून वाचवते. उष्णतेमध्ये घाम आल्यावर जेव्हा आपण बाहेरून एसी रूममध्ये येतो तेव्हा खूप रिलॅक्स होतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की एसी बहुतेकदा भिंतीच्या वरच्या बाजूला का लावले जातात? एसी खालीदेखील बसवता येतो, पण तो नेहमी वर का लावला जातो? आणि त्यामागे काय कारण आहे? चला, या प्रश्नाचे उत्तरही जाणून घेऊ या.
खोलीत एसी वरच्या बाजूला लावण्याचे शास्त्रीय कारण आहे. हे वर माउंट केले जाते, जेणेकरून खोलीच्या आत गारवा राहील. हे लक्षात घेऊन ते भिंतीवर बसविण्यात येते. एअर कंडिशनरच्या आतून थंड हवा बाहेर येते, जी नेहमी जमिनीच्या दिशेने प्रवास करते. ही गोष्ट लक्षात ठेवून ती भिंतीच्या वरच्या बाजूला बसविण्यात येते. त्याच वेळी, हीटर नेहमी खाली जमिनीजवळ स्थापित केले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे गरम हवा खूप हलकी असते आणि ती नेहमी वरच्या दिशेने फिरते. जेव्हा घराच्या आत एसी चालू होतो, त्या काळात थंड हवा खालच्या दिशेने येते तर गरम हवा वरच्या दिशेने जाते. या संपूर्ण प्रक्रियेला संवहन म्हणतात.
या कारणास्तव, जेव्हा घराच्या आत एसी चालू असतो, त्या काळात घराचे तापमान खालच्या ऐवजी वरच्या दिशेला जास्त राहते. हे मुख्य कारणांपैकी एक आहे, ज्यामुळे एसी नेहमी भिंतीच्या वरच्या भागावर लावला जातो. एसी वरच्या भागातून गरम हवा बाहेर काढून टाकण्याचे काम करते. यामुळे त्याच्या आऊटरला म्हणजे बाहेरील बाजूस उष्णता असते. जर एसी चुकून खालच्या दिशेने लावला गेला तर त्याची थंड हवा खाली फरशीवरच राहील. यामुळे संपूर्ण खोली थंड होणार नाही.