नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; १० कोटींची खंडणी मागितली

राजकारणातील अजातशत्रू असलेल्या नितीन गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या संदर्भात खोटी आणि जातिवाचक पोस्ट महाराष्ट्रातील अनेक व्हॉट्सअँप ग्रूपवर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; १० कोटींची खंडणी मागितली

नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळच्या सुमारास दोन वेळा फोन करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ माजली. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात दाखल झाले आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी सुद्धा या बातमीला दुजोरा दिलाय. नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोर नितीन गडकरींचं हे जनसंपर्क कार्यालय आहे. नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

नितीन गडकरींना धमकीचे फोन येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १४ जानेवारी रोजी गडकरींना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता. धक्कादायक म्हणजे मागच्या वेळी ज्या गुंडाच्या नावाने धमकी देण्यात आली होती, त्याच गुंडाच्या नावाने आज सकाळी पुन्हा एकदा दोन वेळा कॉल आले. जयेश पुजारी असं या गुंडाचं नाव आहे. या कुख्यात गुंडावर हत्या, अपहरण आणि खंडणी वसूलीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी तो कर्नाटकातील कारागृह तोडून फरार देखील झाला होता. पुन्हा एकदा त्याच गुंडाच्या नावाने आज दोन वेळा धमकीचे फोन आल्यानं पोलीस यंत्रणेच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या गुंडाला जयेश कांता नावाने देखील ओळखलं जातं.

आज २१ मार्च सकाळी दोन वेळा गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे धमकीचे कॉल आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलप्रकरणी त्यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

राजकारणातील अजातशत्रू असलेल्या गडकरी यांना धमकावणारा फोन आल्याने सर्वांच्याच काळजात धस्स झाले अन् एकच खळबळ उडाली. सर्वांशी चांगले संबंध असणाऱ्या गडकरी यांना कोण धमकी देऊ शकतं? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला. आज सकाळी आलेल्या धमकीच्या फोननंतर नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान नितीन गडकरींविरुद्ध जातीवाचक व खोटी पोस्ट महाराष्ट्रातील अनेक व्हॉट्स एपवर पसरविली जात आहे. या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दत्तात्रय जोशी नामक एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नितीन गडकरी यांच्या नावे काही आक्षेपार्ह मजकूर ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ वर पसरवली जात असल्याची माहिती त्यांना समजताच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

कसबापेठ पोट निवडणुकीत सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावावे पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. याबाबत केंद्रिय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाने बनावट पोस्ट असल्याचा खुलासा केला होता. निकालानंतर गडकरींनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्याच्या उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या खोडसाळपणाबद्दल देखील काही दिवसांपूर्वी नितीन गडकरीकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे, असे नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ट्विटरवरून स्पष्ट केले होते. या प्रकरणी नितीन गडकरी यांनी ट्वीट करून झालेला प्रकार सांगितला होता.

या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेली पोस्ट ही विशिष्ट समाजाला चिथावणी देणारी आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही पोस्ट व्हायरल व तयार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.