पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्याने संजय राऊत अडचणीत

पाच मार्च रोजी एका बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोघा संशयित आरोपीनी अत्याचार केला होता. पीडित मुलगी ही रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पीडित मुलीचा फोटो ट्विट केल्याने संजय राऊत अडचणीत

बार्शी - बार्शी तालुक्यात एका अल्पवयीन तरूणीवर बलात्कार करून त्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता. राऊत यांनी शनिवारी दुपारी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला फोटो ट्विट करत, संशयित आरोपी मोकाट आहेत. भाजप पुरस्कृत आहेत अशी माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीची ओळख दाखवण्यासारखे कृत्य केल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. अखेर बार्शी पोलीसांनी खासदार संजय राऊत यांवर भा.द.वि.जे.जे ऍक्ट 74,228-ए,नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी फोन वरून माहिती देताना ही अधिकृत माहिती दिली.

पाच मार्च रोजी एका बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर दोघा संशयित आरोपीनी अत्याचार केला होता. त्यानंतर 6 मार्च रोजी पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करत, त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशन व बार्शी ग्रामीण पोलीस ठाणे येथे अक्षय विनायक माने (वय 23 वर्ष), नामदेव सिद्धेश्वर दळवी (वय 24 वर्ष, दोघे रा, बाळेवाडी ता बार्शी, जि सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पीडित मुलगी ही रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते. 

पीडित तरूणीवर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोयत्याने वार केल्याने त्याच्या डोक्यावर, हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. उजव्या हाताची बोटे तुटली आहेत. पीडितेच्या आई वाडीलांनी माहिती देताना, न्याय मागितले आहे. संशयित आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. संशयित आरोपीचा बार्शीत राजकिय नेत्यांसोबत संपर्क आहे. संशयित आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत असलेले फोटो देखील सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शी येथे ही घटना घडडली आहे. भाजपाच्या गुंडांनी 5 मार्चला तिच्यावर हल्ला केला असून ती पारधी समाजाची आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका असं आवाहन यावेळी त्यांनी फडणवीसांना केलं आहे. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? ५ मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत," असं संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.