विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची प्रतिकात्मक चूल पेटवत महागाईविरोधात घोषणाबाजी
वाढलेल्या महागाईवरून आज विरोधकांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच प्रतिकात्मक चूल पेटवून सरकारचा निषेध केला.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच चूल पेटवली व सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनात विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचा तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्न दाखवणं आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे यांनी केली. शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात राखडल्या आहेत. प्राध्यापकांच्या भरतीला देखील विलंब होत आहे. सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सगळं सुरु आहे. 18 हजारांच्या वर कंत्राटी कर्मचारी 15 हजार पगारावर काम करत असल्याचे कायंदे म्हणाल्या. एसटीमध्ये 50 टक्के सूट दिली. परंतु ग्रामीण भागातील महिलांना विचारा त्यांना हे अपेक्षित आहे की 1100 रुपयांचा सिलेंडर कमी पैशात मिळणं अपेक्षित आहे. कुठे गेल्या महागाईवर गदारोळ करणाऱ्या त्या महिला नेत्या? असा सवालही कायंदे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सोमवारपासून राज्यात शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुरू असलेला संप गुरुवारी (१६ मार्च) चौथ्या दिवशी कायम होता. संपकऱ्यांना अद्याप चर्चेचे निमंत्रण मिळालेले नसून त्यांचा संपाचा निर्धार कायम आहे. राज्यातील नगर परिषदांचे सर्व कर्मचारी संपात सामील झाल्याने संपकरी कर्मचाऱ्यांची संख्या 19 लाखांवर गेली आहे.