पुण्यात पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

सुदिप्तोने पत्नी प्रियांका गांगुली (वय. 40 ) आणि मुलगा तनिष्क गांगुली (वय 8) यांचा खून करून स्वतः आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या

पुणे - पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. सुदीप्तो गांगुली (वय ४४, रा. औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

सुदिप्तो गांगुली (44, रा. औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली (वय. 40 ) आणि मुलगा तनिष्क सुदिप्तो गांगुली (वय 8) चा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. सुदिप्तो गांगुली हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून कामाला असल्याची माहिती मिळाली आहे.

गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता. त्याचा बेंगलोर येथील भाऊ मित्रांकरवी शोधा-शोध करीत होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांनी सुदिप्तो आणि त्याची पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली.

बुधवारी दुपारी पोलिसांनी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले असता त्यांना घरात 3 मृतदेह आढळून आले आहेत. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली आहे. मात्र, सुदिप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.