ब्लॉक झालेल्या खात्याचे धनादेश देत 35 लाखांची फसवणूक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - ब्लॉक झालेल्या बँक खात्याचे धनादेश देत 35 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी साईरंग डेव्हलपर्सचे चेअरमन किझाकुम रशीद मलिक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 6 नोव्हेंबर 2022 रोजी साईरंग डेव्हलपर्स ऑफिस हिंजवडी फेज दोन येथे घडला. प्रबीर कुमार राधारमण पॉल (वय 71, रा. लोहगाव, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मलिक यांच्याशी मे-जून 2013 मध्ये लेक व्ह्यू साईट हिंजवडी व इमरल्ड व्हॅली हिंजवडी जवळील साईटवर प्लॉट नंबर 179 चा व्यवहार झाला होता. तो व्हावहार रद्द करण्यासाठी दोन्ही प्लॉटची रक्कम व्याजासह 45 लाख रुपये परत देण्याचे ठरले. त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये देण्यात आले. उर्वरित 35 लाख रुपये देण्यासाठी ब्लॉक केलेल्या एका बँक खात्याचे आठ धनादेश फिर्यादी यांना देऊन त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.