स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र इंगळे यांचा दुबईत जीवन गौरव पुरस्काराने गौरव

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र इंगळे यांचा दुबईत जीवन गौरव पुरस्काराने गौरव

पिंपरी - डॉ. रविंद्र प्रल्हाद इंगळे हे स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसुतीशास्त्रज्ञ असून विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे त्यांनी सहायक प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे, तसेच त्यांनी मरोळ येथील सरकारी प्रसुतीगृह येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच  वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे प्राध्यापक म्हणून काम पाहिलेले असून सध्या ते ऐजंल पॉलिक्नीक आणि परी नर्सिंग होम जय गणेश साम्राज्य भोसरी येथील हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

नुकतेच त्यांना प्रमुख पाहुणे एस.के. ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी  मिलिंद रोकडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

मागील चार वर्षापासून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथील 25 पदव्या मिळवणारे व त्यांच्यावर व त्यांच्या कार्यावर किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग हे पुस्तक प्रकाशित झालेले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलेले प्रसिद्ध विचारवंत लेखक, उत्कृष्ट प्रशासक, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून या कार्यक्रमाचे दरवर्षी दुबई येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस के ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला मीनाझ फईम,  यशदा पुणे येथील केंद्रप्रमुख डॉ.बबन जोगदंड, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड आणि प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यवसायिक, तिक्षगत वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष  सुगत वाघमारे व डॉ. विजय पोतदार आदी उपस्थित  होते.

दुबई येथील हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा जीवनगौरव पुरस्कार मिळवल्याबद्दल डॉ.  इंगळे यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.