राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी
ईडी कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नीला अश्रू अनावर. आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. पहाटे ५ ते ६च्या दरम्यान ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या निवास्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. यापूर्वी ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील नातेवाईकांच्या निवासस्थानी तसेच गणेशखिंड रस्त्यावरील एका कार्यालयात इडीच्या पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी ‘ईडी’च्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली होती.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हसन मुश्रीफ यांचे समर्थक हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या कारवाईविरोधात व केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.
सकाळीच अधिकाऱ्यांचे पथक आल्याचे पाहून मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मुश्रीफ यांच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मुश्रीफ यांचे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी त्यांना समजूत घेण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी ‘भाजप सरकार हाय हाय’ अशी घोषणाबाजी सुरू केली.
या कारवाईविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या नेत्यांमध्ये जयंत पाटील, अरविंद सावंत, संजय राऊत यांचा समावेश आहे.
जयंत पाटील म्हणाले की, ईडीने अशा प्रकारे पहाटे हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा टाकला आहे, ही बाब धक्कादायक आहे. कितीवेळा छापा टाकली जाणार आहे? मुंबई हायकोर्टाने याच प्रकरणांची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मतं व्यक्त केली, की एजेन्सीजचा गैरवापर केला जातो आहे. लोकांच्याही या गोष्टी लक्षात आल्या आहेत ही मतं हायकोर्टाने व्यक्त केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे धाडसत्र राबवलं जातं हे आश्चर्यकारक आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
जो कुणी सरकारविरोधात बोलत आहे, सरकारविरोधात आवाज उठवत, त्याच्यावर ईडीची धाड टाकली जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई, यामधीलच एक प्रकार आहे. मात्र सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लंफग्यांना जनता एक दिवस रस्त्यावर पकडून मारेल, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.