'भोसलेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांना जामीनावर कोणी बाहेर काढले?' - अजित पवार

भारतीय जनता पक्षाला चिंचवड आणि कसबा अशा दोन्ही मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तळ ठोकून आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र...

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'भोसलेंवर हल्ला करणाऱ्या गुंडांना जामीनावर कोणी बाहेर काढले?' - अजित पवार

भाजपला कंटाळलेल्या जनतेने निवडणूक हातात घेतली

चिंचवड, दि. 24 (प्रतिनिधी) - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसलेवर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लागला होता. त्यांना जामीनावर बाहेर कोणी सोडले? याची माहिती जनतेला आहे. सर्व प्रकारच्या दादागिरीची जाणीव असलेली जनता आपला राग मतपेटीतून व्यक्त करेल, आणि नाना काटे यांना विजयी करेल असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी प्रचाराची सांगता पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली, त्यावेळी अजित पवार बोलत होते. पक्षाचे निरीक्षक आमदार सुनील शेळके, उमेदवार नाना काटे, माजी आ. विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, रविकांत वर्पे, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ  आदी यावेळी उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला चिंचवड आणि कसबा अशा दोन्ही मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तळ ठोकून आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र पक्षाचे अपहरण, गुन्हेगारी, भ्रष्ट कारभार याला जनता कंटाळली असून जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली आहे. जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद याची प्रत्यय मला रोड शो आणि मतदारांशी संवाद साधत असताना आला आहे. 

आजपर्यंत असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला नाही !

आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात जनतेकडून मिळालेला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मला यापुर्वी कधीच पहायला मिळाला नव्हता. जनतेनेच ही पोटनिवडणूक हाती घेतली आहे. या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला जनता वैतागली आहे, त्यामुळे आमच्या सहकाऱ्यांना फोन करून धमकावण्याचे प्रकार कानावर आले आहेत. या दडपशाहीला जनता कंटाळलेली आहे. त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिवसेनेचे अपहरण झाल्याचा प्रचंड असंतोष जनतेत आहे

शिवसेना कोणाची याची न्यायालयात लढाई सुरू असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथराव शिंदे यांना देऊन टाकले. ही बाब मराठी बांधवांच्या हितासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना व महाराष्ट्रातील जबाब शिवसैनिकांना रुचली नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. याविषयी जनतेत संतापाची भावना आहे. निवडणुक आयोगाचा हा वादग्रस्त निर्णय जनतेला मान्य नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या रॅलीला चिंचवड आणि कसब्यात अफाट प्रतिसाद मिळाला. सरकारकडून होत असलेल्या मुस्कटदाबीविषयी जनतेच्या मनात असणारा राग मतपेटीतून व्यक्त करत नाना काटे यांना विजयी करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्राचा बिहार बनवला

चिंचवड आणि कसब्यातील मतदारांना ही गुंडगिरी रुचणारी नाही. सचिन भोसलेंवर झालेला हल्ला ही सत्ताधाऱ्यांच्या पायाखालील वाळू निसटल्याचे लक्षण आहे. अशी गुन्हेगारी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये होत असल्याचे आपण ऐकून होतो. सुसंसकृत महाराष्ट्रात ही घटना घडली. महाराष्ट्राच्या सुसंस्कृततेला धक्का लावण्याचे काम या भारतीय जनता पक्षाने केले आहे, असा आरोप पवार यांनी यावेळी केला. 

आगामी निवडणुकांसाठी पोटनिवडणुकीचा निकाल दिशादर्शक ठरणार आहे त्यामुळे चिंचवड व कसबा मधील निकाल महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय मिळेल आणि या निकालांनी अगामी निवडणुकात परिवर्तन झालेला दिसेल. उध्दव ठाकरे यांच्यासोबत माझा नियमित संवाद असतो. त्यांनी विभागवार मेळावे घेऊन जनतेत जाण्याचे ठरवले आहे. यावेळी लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली. 

 शरद पवार यांनी अजित पवारांवर अन्याय केला आहे, अशी टीका भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे, त्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, बावनकुळे माजी मंत्री असतानाही त्यांना तिकीट नाकारले त्यानंतर त्यांच्या पत्नी यांच्या नावे उमेदवारी अर्ज भरायला गेले आणि अर्ज भरू नका असा फोन आल्याने हात हलवत परत यावे लागले होते. त्यामुळे त्यांना सर्वच लोकांवर अन्याय होत असल्याचे दिसत आहे, असे सांगताच पत्रकार परिषदेत हशा उसळला.