भाजपचे उमेदवार रासने, माजी नगरसेवक बिडकर व विष्णू हरिहर यांच्यावर गुन्हा दाखल

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना नू.म.वि. प्रशालेत असणाऱ्या बूथवर भाजपचे उमेदवार हेमंत रासने गळ्यात भाजप पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून आले होते.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपचे उमेदवार रासने, माजी नगरसेवक बिडकर व विष्णू हरिहर यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे -  भाजपचे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी हेमंत रासने यांच्याविरुद्ध निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली पाटील यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे की, "कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना नू.म.वि. प्रशालेत असणाऱ्या बूथवर भाजपचे उमेदवार हेमंत रासने गळ्यात भाजप पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी घालून आले होते."

"त्यांनी भाजपचं चिन्ह असलेला रुमाल घालून मतदान केंद्रात प्रवेश केला. तसेच मतदानही केलं. सदरची घटना माध्यमांनी चित्रित केलेली असून, या प्रकारामुळे हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांना पोलिसांनी वा अधिकाऱ्यांनी प्रतिबंध का केला नाही," असा सवालही रुपाली पाटील ठोंबरे यांनी तक्रारीत केलेला आहे.

माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यावर गुन्हा दाखल

दुसरीकडे पैशाचे पाकीट न घेतल्यामुळे एका महिलेसह तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह 18 ते 19 जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीच्या रात्री गंजपेठेत हा संपूर्ण प्रकार घडला. विष्णू हरिहर (वय 60), निर्मल हरीहर (वय 37), हिरा हरिहर (वय 67) यांच्यासह 15 ते 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी निता किशन शिंदे (वय 43) या महिलेने तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी च्या रात्री गंजपेठेतील त्यांच्या निवासस्थानी होत्या. यावेळी घरी आलेल्या काही लोकांनी त्यांना पैशाची पाकीट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी यांनी नकार दिला. यावेळी फिर्यादी यांचा भाऊ कुणाला कांबळे यांनी असे करू नका असे सांगितले असता आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमा करून त्यांना आणि फिर्यादी आणि फिर्यादीच्या मावशीला मारहाण केली. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा

कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी गणेश बिडकर यांच्यासह मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्या विरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख (वय ३८, रा. २१६ मंगळवार पेठ, मालधक्का चौक) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बिडकर आणि त्यांचे कार्यकर्ते रविवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांसह आले होते. फैयाज शेख आणि त्यांचे मित्र याकूब बशीर शेख या भागात फिरत होते. त्या वेळी भाजपाचे कार्यकर्ते आएशा कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती शेख यांना मिळाली.

त्यानंतर शेख तेथे गेले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी दिसून आली. पिशवीत मतदार स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. पिशवीत पैसे असल्याचे शेख यांना समजले. त्यांनी बिडकर आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी फैयाज आणि याकूब शेख यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, असे फैयाज शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या अदखलपात्र तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.