जनाब सेना म्हणून हिणवणाऱ्या फडणविसांना शिवसेनेने दाखवला आरसा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. २१ मार्च - भाजपचे नेते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य करत असतात. अशातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकासआघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची 'जनाब सेना' झालीय अशी टीका केली होती. पण शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी असे काही फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत की फडणवीसांची बोलतीच बंद होणार आहे.
मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात ते उपस्थित राहिलेल्या एका कार्यक्रमाचे फोटो ट्विट केले आहेत. देवेंद्र फडणवीस बोहरी मुस्लीम समुदायाच्या एका कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा कार्यक्रमपत्रिकेवर देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या नावापूर्वी जनाब असे संबोधन लावल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत देवेंद्र फडणवीस मजारीपुढे नतमस्तक झालेले दिसत आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लिमधर्मीयांची टोपीही परिधान केली होती. हाच धागा पकडत मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस जनाब शब्दावर आक्षेप घेतात. पण तेव्हा चादर चढवतांना आपला स्वाभिमान वाकला अथवा झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग, असा थेट सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केल्या जाणाऱ्या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिले होते. मुसलमानांविषयी भाजपने काही केलं तर ते देशप्रेम, आम्ही काही केलं तर तर तो देशद्रोह ठरतो असा प्रतिटोला हाणला होता. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं? हा काळा इतिहास पाहून आम्ही अजूनही त्यांना भारतीय जनता पक्षच म्हणतोय, पाजपा म्हणजे पाकिस्तान जनता पक्ष म्हणत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.