मुंबईत दोन वंदे मातरम ट्रेन्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबईत दोन वंदे मातरम ट्रेन्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला खूप आनंद होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदेमातरम ट्रेन्सचं उद्घाटन करताना म्हटलं आहे. या वेळी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इथे जमलेले सगळेच लोक या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबईसाठी खूप मोठा आहे. आज पहिल्यांदाच दोन वंदे भारत ट्रेन्स एकत्र सुरू झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे या दोन आर्थिक केंद्रांना धर्माच्या केंद्रांशी जोडणार आहेत.

महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना प्रोत्साहन देणाऱ्या ट्रेन आहेत. शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भेट देणं वंदे भारतमुळे सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणं सोपं होणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी आज शुभेच्छा देतो. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक भारताच्या वेगाची खूण आहे. भारताची प्रगती आणि वेग या दोन्हींचं प्रतिबिंब म्हणून वंदे भारतकडे पाहिलं पाहिजे.

आत्तापर्यंत देशात १० वंदे भारत ट्रेन्स सुरू झाल्या आहेत. देशातल्या १७ राज्यातल्या १०८ जिल्ह्यांना जोडण्याचं काम वंदे भारत एक्स्प्रेसने केलं आहे. एक काळ होता की खासदार चिठ्ठी लिहायचे आणि सांगायचे की आमच्या स्टेशनवर एक्स्प्रेस ट्रेनला दोन मिनिटं थांबा हवा. आज देशभरातले खासदार भेटतात तेव्हा वंदे भारत ट्रेनची मागणी करतात असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या लोकांना ही ट्रेन हवी होती त्यामुळेच आम्ही एकदा दिवसात दोन ट्रेन्स सुरू केल्या आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मला हा विश्वास आहे की डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल. महाराष्ट्रात रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होणार आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, ''कोणी कल्पाना केली नसेल भारतात अशा प्रकारची गाडी धावेल. मात्र, नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे. त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं. त्यामुळे त्यांचे आभार मानायला हवे'', असं ते म्हणाले.

''वंदे भारत एक्सप्रेस ही शिर्डी आणि सोलापूर या दोन ठिकाणी धावणार आहे. त्यामुळे साईबाबा आणि आई भवानीचा आशीर्वाद मिळणार आहे. महाराष्ट्रातील या ट्रेनच्या प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदी यांनी तब्बल १३ हजार कोटी दिले.

वंदे भारत ट्रेन ही भाविक आणि प्रवाशांसाठी मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाला पंतप्रधान मोदींनी भरभरून मदत दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच पंतप्रधान मोदींचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल'', असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

या वेळी एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना गणपतीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच २२ दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दोऱ्यावर आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.