“गण गण गणांत बोते"च्या जयघोषात निगडीत गजानन महाराज प्रकट दिन साजरा

“गण गण गणांत बोते"च्या जयघोषात निगडीत गजानन महाराज प्रकट दिन साजरा

पिंपरी (प्रतिनिधी) - गण गण गणांत बोते च्या जयघोषात, हजारो भक्तांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरण येथे श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. या वेळी माजी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, शैलेजा मोरे, शर्मिला बाबर, धनंजय काळभोर, संगीता भोंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

पहाटे ५ ते ६:३० वा काकड आरती, तसेच स.७ ते ९:३० यावेळेत सीमा यशवंत दिघे, प्रेमा गणेश हेगडे, कल्याणी रसिक पिसे यांच्या हस्ते महापूजा महाभिषेक व आरती करण्यात आली.

स. ९ ते ११ गोपाळ कोकाटे आणि सहकारी भावसुमने हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यशवंत पाटील व पुरुषोत्तम गोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दु १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद तर १ ते ३:३० या वेळेत डॉ अनघा राजवाडे व सहकारी शेगांवच्या महंता हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम तर,

३:३० ते ६ यावेळेत अविनाश लेले शुभांगी मुळे, मोहन पारसनिस रवी सिधये, नरेंद्र काळे भक्तीरंग हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर केला. संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. रमेश ढमढेरे व अतुल इनामदार यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली.

गजानन महाराज ट्रस्ट, सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट,प्रांत पोलीसिंग मित्र संघ आणि निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.

दिनांक १२ रोजी सकाळी ७ वा. श्रींच्या पादुका व मूर्तीवर उद्योजक अभय असलकर, योगेश निमोदिया यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला .दिनकर पुणतांबेकर निलेश शिंदे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.

प्रकटदिनाच्या पूर्व संध्येला स ७ ते दु ३ वा गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक  पारायण, ३ वा भजन, संध्याकाळी ५ ते ८ प्राधिकरणातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या टाकत, महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. हजारो भाविकांनी औक्षण करून दर्शन घेतले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामभाऊ पिसे, एमएस तारक, एम.इ. जाधव, उपाध्यक्ष भाऊराव खडसे, सचिव देवीदास हरमकर, खजिनदार महादेव कथले, अभय तारक रसिक पिसे, विकास ठाकरे, रवी मिरजी, सचिन राडे यांनी विशेष परिश्रम घेतले.