मावळमध्ये 54.87 टक्के मतदान!

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मावळमध्ये 54.87 टक्के मतदान!

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडले. मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने मंगळवारी जाहीर केली आहे. त्यानुसार मावळ मतदारसंघात एकूण 54.87 टक्के मतदान झाले.

मागीलवेळी 60 टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी 5 टक्क्यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. उरणमध्ये सर्वाधिक तर पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये  एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

या मतदारसंघात 25 लाख 85 हजार 18 मतदार असून यामध्ये 13 लाख 49 हजार 184 पुरूष मतदार, 12 लाख 35 हजार 661 महिला मतदार आणि 173 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यापैकी 14 लाख 18 हजार 439 जणांनी मतदान केले. त्यामध्ये 7 लाख 77 हजार 742 पुरुष तर 6 लाख 40 हजार 651 महिला आणि इतर 46 जणांनी मतदान केले आहे.

पनवेलमध्ये 50.05 टक्के मतदान

पनवेल विधानसभा मतदारसंघात 5 लाख 91 हजार 398 मतदार होते. त्यापैकी 2 लाख 95 हजार 973 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 50.05 टक्के आहे.

कर्जतमध्ये 61.40 टक्के मतदान

कर्जत विधानसभा मतदारसंघात 3 लाख 9 हजार 208 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 89 हजार 853 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. 61.40 टक्के मतदान झाले.

उरणमध्ये सर्वाधिक 67.07 टक्के मतदान

उरण विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 19 हजार 318 मतदार आहेत.  त्यापैकी 2 लाख 14 हजार 169 जणांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 67.07 टक्के इतकी आहे.

मावळमध्ये 55.42 टक्के मतदान

मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 73 हजार 408 मतदार आहेत. त्यापैकी  2 लाख 6 हजार 949 जणांनी मतदान केले. याची टक्केवारी 55.42 टक्के आहे.

चिंचवडमध्ये 55.20 टक्के मतदान
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6 लाख 18 हजार 245 मतदार आहेत. त्यापैकी 3 लाख 22 हजार 700 जणांनी मतदान केले. याची टक्केवारी 55.20 टक्के आहे.

पिंपरीत 50.55 टक्के मतदान
पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 73 हजार 448 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 88 हजार 795 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. याची टक्केवारी 50.55 टक्के आहे.