सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी सायकल वाटप 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी सायकल वाटप 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव कामशेत येथील मुलींना शिक्षण घेण्यासाठी दररोज ५ किलोमीटर पायी जावे लागत होते. याची माहिती तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते रामदास वाडेकर यांना मिळाली असता, त्यांनी डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ चे सामाजिक कार्यकर्ते व झोन चेअरपर्सन भरत इंगवले यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर  लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशनस व मेडीजैन ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यमाने या शाळेतील मुलींना नवीन २५ सायकली देऊन शिक्षण घेण्यास मदतीचा हात दिला.
या वेळी या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन शैलजा सागळे, झोन चेअरपर्सन भरत इंगवले, युवानेते नितिन इगवले, क्लबचे अध्यक्ष जितेंद्र ठोंबरे, सचिव लायन पद्मजा कदम, खजिनदार लायन सीमा ठोंबरे, उपाध्यक्ष गुरुप्रसाद कनोजिया व लायन्स कलबचे नवनिर्वाचित सभासद व सविता इंगवले, विश्वास कामठे, अतुल दळवी, चंद्रकांत दरेकर, सरपंच दिपाली साबळे, पोलीस पाटील तंबोरे उपस्थित होते. तसेच मेडीजैन ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर संदीप लुणावत, अध्यक्ष डॉ. पराग जैन, सचिव डॉ निलेश कटारिया, खजिनदार डॉ. किशोर जैन तसेच मेडीजैन ट्रस्टचे सभासद व नीता लुणावत असे बहुसंख्येने उपस्थित होते. 
या वेळी बोलताना झोन चेअरपर्सन लायन भरत इंगवले म्हणाले की, क्लब मार्फत दरवर्षी ग्रामीण भागातील मुलीसाठी ५१ सायकल देत असतो आणि त्या सायकली एक वर्षानंतर परत दुरुस्त पण करून दिल्या जातात व त्याचा खर्च पण क्लब मार्फत केला जातो.
करजगाव शाळेतील मुलींना सायकली मिळण्यासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस रामदास वाडेकर व उपसरपंच नवनाथ ठाकर यांनी परिश्रम घेतले.