उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल – अब्दुल सत्तार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्धव ठाकरेंवर कारवाई करावी लागेल – अब्दुल सत्तार

शिवसेना व शिंदे गटातील संघर्ष उफाळला

जसाच तसे उत्तर देण्याचा सत्तारांचा इशारा

पुणे (प्रबोधन न्यूज) - मंगळवारी रात्री उशीरा माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. तानाजी सावंत यांच्या घरी जाताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. या प्रकरणी शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असेल, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील”, असे ते म्हणाले.

या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागेल. एका कडून मारल्या जात असेल तर दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

शिवसेना नेते बबन थोरात यांनी दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. याबाबतही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”बबन थोरात यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा या सर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.