सत्यजीत तांबेंचा विजय; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई (प्रबोधन न्यूज) - नाशिक पदवीधरमध्ये मविआच्या शुभांगी पाटलांपेक्षा २९ हजारांचे मोठे मताधिक्य घेऊन अपक्ष सत्यजित तांबे विजयी झाले. सत्यजित तांबेंना ६८,९९९ मते मिळाली आहे. तर मराठवाडा शिक्षकमध्ये मविआच्या विक्रम काळेंनी सलग चौथ्या विजयाचा विक्रम केला. त्यांना २३,५७७ मते मिळाली आहेत. नागपुरात मविआचे सुधाकर अडबाले तर अमरावतीत धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत.
दीपक केसरकर यांनी सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नसल्याची भूमिका मांडली आहे. “सत्यजीत तांबेंनी विधानपरिषद निवडणूकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. ते अपक्ष म्हणून जर विधानपरिषदेत जाणार असतील, तर त्यानंतर त्यांना पक्ष बदलता येणार नाही. ते इतर पक्षांना पाठिंबा देऊ शकतात”, असं दीपक केसरकर म्हणाले.
निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सत्यजीत तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतं आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात”, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
“माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मनं जिंकण्याचं काम केलं. हाच ऋणानुबंध पुढे नेण्याचं काम मी करेन. सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत मी ४ तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन”, असं यावेळी तांबेंनी नमूद केलं.
सविस्तर निकाल -
नाशिक : पदवीधर
सत्यजित तांबे विजयी (अपक्ष) एकूणमते ६८,९९९
शुभांगी पाटील (मविआ) २९,४६५ मतांनी पराभूत
नागपूर : शिक्षक
सुधाकर अडबाले विजयी (मविआ) एकूण मते १६,७००
ना.गो. गाणार (भाजप) ८,४८९ मतांनी पराभूत
मराठवाडा : शिक्षक
विक्रम काळे, मविआ दुसऱ्या पसंतीत विजयी, एकूण मते २३,५७७
किरण पाटील (भाजप) ६,९३४ मतांनी पराभूत
कोकण : शिक्षक
ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी (भाजप),एकूण मते २०,६८३ मते
बाळाराम पाटील (मविआ) ९,६८६ मतांनी पराभूत
अमरावती : पदवीधर
धीरज लिंगाडे आघाडीवर (मविआ), दोन हजारांचे मताधिक्य
पिछाडीवर (भाजप) डॉ. रणजित पाटील (फेरमतमोजणी सुरु)