पायाखालची वाळू घसरल्याने राहूल कलाटेंकडून खोटा प्रचार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
राष्ट्रवादीचे वाकड परिसरातील नेते विशाल वाकडकर यांचा टोला
चिंचवड :- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांच्या पायाखालची वाळू घसल्याने ते खोटा प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची छायाचित्रे स्वत:सोबत प्रसिद्ध करून त्यांना आपल्यासोबत जोडण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे माजी शहराध्यक्ष तथा वाकड परिसरतील युवा नेते विशाल वाकडकर यांनी लगावला आहे.
याबाबत विशाल वाकडकर यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करून राहूल कलाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. सन २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे त्यांना गेल्या निवडणुकीत १ लाख १२ हजार मते मिळाली. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्यावेळी युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी देखील त्यांचा प्रचार केला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संपूर्ण प्रचार यंत्रणाना त्यांना आयती मिळाली होती.
सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी बंडखोरी केल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदारांनीही त्यांना नाकारले आहे. त्यांच्या प्रचारात सध्या कोणीही सहभागी होत नसल्याने ते विचलित व निरुस्ताही झाले आहेत. त्यांच्या प्रचाराकडे कोणीच फिरकत नसल्याने नागरिकांमध्ये दिशाभूल करणे, खोटा प्रचार करणे व इतर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचे भासवून मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ता असतानाही ते तिसऱ्या आघाडीचा दावा करून मी त्यांच्यासोबत असल्याचा दावा करतात ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. खोट्या प्रचाराच्या आधारावर कोणीही विजयी होऊ शकत नाही. त्यामुळे कलाटे यांच्या भूलथापा आणि खोट्या प्रचाराला बळी न पडता सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पाठीशी आपली ताकद लावून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही विशाल वाकडकर यांनी केले आहे.