फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर, पण अमित शहांचा फोटो गायब; चर्चेला उधाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

फडणवीसांच्या अभिनंदनाचे बॅनर, पण अमित शहांचा फोटो गायब; चर्चेला उधाण

नागपूर, (प्रबोधन न्यूज) - देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले होर्डिंग नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे.

नागपूर शहरातील विविध भागांमध्ये लागलेल्या या होर्डिंग वर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नागपूरचे विधान परिषद सदस्य आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांचे फोटो आहेत परंतु या फोटोतून अमित शहा यांचा फोटो गायब असल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

''प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार तुझ्यापुढे आम्ही खूप खुजे आहोत, तुला आमचा सलाम'', त्याचबरोबर ''देवेंद्रा तुझ्या त्यागाचे मोल मौल्यवान आहे. आपल्या गळ्यातील माळ एका क्षणात दुसऱ्याच्या गळ्यात घातली. आधी पक्ष आणि नंतर मी हे मूल्य तू खरे करुन दाखविले आहे''. अशा आशयाचे होर्डींगवरती नागपुरात लागले आहेत. नागपुरातील विमानतळ परिसर, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौकात असे होर्डिंग लावण्यात आले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीच फडणवीस यांचा पत्ता कट केल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जरी पक्षाचा आदेश पाळला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात गृहमंत्री अमित शहांवर नाराजी असल्याचे बॅनरमधून दिसून येत आहे.