पंजाबी वधू-वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – 'पंजाबी वेलफेअर फाउंडेशन' पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या वतीने रविवार दि . २८ जून रोजी वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. आकुर्डी येथील वृद्धाश्रमात आयोजित या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह अहमदनगर, जळगांव, बार्शी, श्रीरामपूर येथील पंजाबी व शीख समाजाचे एकूण ४०० बांधव मेळाव्यास उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगेश बहल तसेच सुरेंद्र वधवा व मनजितसिंग बिलखू होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगेश बहल म्हणाले की, "पंजाबी समाज भारतातील विविध राज्यांमध्ये व्यवसायानिमित्त स्थायिक झाला आहे. पंजाबी लोकांनी त्या-त्या राज्यातील संस्कृती तसेच समाजजीवन स्विकारल्यामुळेच त्यांची प्रगती झालेली दिसते. आधुनिक काळात शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळे या समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणी विविध नोकरी-व्यवसायात जम बसविताना दिसतात, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. पंजाबी समाजाने बदलत्या काळानुसार स्वतःमध्येही जरूर सकारात्मक बदल घडवले पाहिजेत. याबरोबरच आपल्यातील एकोपा टिकवून ठेवला पाहिजे."
या मेळाव्यासाठी हरीश मदान, लीना सप्रा, गीता वोहरा, योगिता भाटिया, योगेंद्र भाटिया, सनी गरेवाल, सुशील सहानी यांनी विशेष परिश्रम घेतले.