नुपूर शर्माने टीव्हीवर येऊन माफी मागावी – सुप्रीम कोर्ट

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नुपूर शर्माने टीव्हीवर येऊन माफी मागावी – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणी प्रकरणी जोरदार फाटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितली आहे. यासोबतच खटला दाखल करण्याची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. नुपूरच्या बदलीच्या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, तिच्या वक्तव्यामुळे देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत. आज देशात जे काही घडत आहे त्याला ते वक्तव्य जबाबदार आहे. आम्ही डिबेट पाहिली, चिथावणी देण्याचा प्रयत्न केला गेलाय, असे न्यायालयाने म्हटलय. पण त्यानंतर त्यांनी जे काही म्हटलंय ते अधिक लज्जास्पद आहे. नुपूर शर्मा आणि तिच्या वक्तव्याने संपूर्ण देश पेटवून दिला आहे. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्या जबाबदार आहेत. नुपूर शर्माने टीव्हीवर येऊन माफी मागावी असंही न्यायालयाने म्हटलंय.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्याबदद्ल भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात आंदोलन, हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. तसेच अनेक मुस्लिमबहुल देशांनी याबाबत उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. तीन दिवसांपूर्वीच याच कारणावरून उदयपूरमध्ये एका व्यक्तीची निघृण हत्या करण्यात आली आहे. त्यावरून आता सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना चांगलंच फटकारलं आहे.

शर्मा यांच्या वकिलांनी न्यायालायत नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने शर्मा यांच्यामुळे संपूर्ण देशात तणाव निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या एकट्याच या तणावाला कारणीभूत असल्याचेही न्यायालय म्हणाले. न्यालायाने दिल्ली पोलिसांवरही ताशेरे ओढले.

शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कोणती पावलं उचलली, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असं म्हणत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर शर्मा यांनी आपली याचिका मागे घेतली.

पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत हे वक्तव्य आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूर दौऱ्यापूर्वी याचे पडसाद कानपूरमध्ये उमटले आणि दोन गटांमध्ये या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. मात्र, हा वाद भारतातच न थांबता देशाच्या सिमेपलिकडे गेला.

या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतलाय. या देशांनी 5 जूनला त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केला होता. कुवेत सरकारला तिथल्या भारतीय दूतावासाने दिलेल्या पत्रात या प्रकाराची निंदा करण्यात आलीय.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले की, "त्यांचा पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या विरोधात आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक धर्म उदयास आले.

भारतीय जनता पक्ष प्रत्येक धर्माचा आदर करतो. भारतीय संविधानाने नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांचा आदर आणि सन्मान करण्याचा अधिकारही दिला आहे."