मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी एकनाथ पवारांचा भाजपला जय महाराष्ट्र
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
प्रदेश प्रवक्ता आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा एकनाथ पवारांनी दिला राजीनामा
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या प्रदेश प्रवक्ते आणि प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला आहे.
रविवारी (दि.२२) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन मातब्बर मराठा नेत्यांवर निशाणा साधला. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजाचे नेते असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसून तमाशा बघण्याची भूमिका घेत आहेत. आपले न्याय हक्क मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांना कदापि माफ करणार नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना मी सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता राजीनामा देत आहे.
माझी राजकीय भूमिका मी २७ तारखेला पुन्हा जाहीर करेल. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पिंपरी चिंचवड शहर बंद असताना झालेल्या सभेत मी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता. त्याच वेळी मी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेईल असे जाहीर केले होते. मागील काळात भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना माझ्यावर विविध आंदोलनाचे किमान १०० गुन्हे दाखल झाले आहेत. मी सामान्य शेतकरी कुटुंबातून शहरात नोकरी निमित्त आलो.
पक्षाने मला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली तसेच २०१४ मध्ये विधानसभा लढण्याची देखील मला संधी मिळाली. पक्षाच्या विविध प्रदेशाध्यक्षांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो.
जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम दिला असतानाही सरकार वेळकाढू पणाची भूमिका घेत आहे. उरलेल्या दोन दिवसात आई तुळजाभवानी या सरकारला राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्याची सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना मी देवीचरणी करत असल्याचे एकनाथ पवार यांनी यावेळी सांगितले.