दिल्लीत एकाच दिवसात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या दुप्पट ; आणखी 10 नवीन रुग्ण आढळले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली -
गुरुवारी दिल्लीत आणखी दोन ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. यासह एकूण प्रकरणांची संख्या 10 झाली आहे. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित नऊ रुग्ण लोकनायक रुग्णालयात दाखल आहेत. राजधानीत 5 डिसेंबर रोजी पहिला ओमिक्रॉन संक्रमित रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून, 10 दिवसांत ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रकरणांमध्ये 10 पट वाढ झाली आहे.
गुरुवारी रुग्णालयाचे संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, येथे आतापर्यंत ४० हून अधिक रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे खाटांची संख्याही आता 100 झाली आहे. 10 पैकी दोन ओमिक्रॉन रुग्ण परदेशात गेले नाहीत. दिल्लीतच संपर्कात आल्यानंतर दोघांनाही संसर्ग झाला.
1 ते 15 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या सर्व रुग्णांना लोकनायक हॉस्पिटल किंवा मॅक्स स्मार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत, 74 पैकी 35 लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 10 लोकांना ओमिक्रॉन प्रकार सापडला आहे. याआधी बुधवारी दोन ओमिक्रॉन संक्रमित आढळले होते.