‘त्या’ अपघातात माझ्या चेहऱ्यांमध्ये 67 काचा घुसल्या होत्या – महिमा चौधरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

‘त्या’ अपघातात माझ्या चेहऱ्यांमध्ये 67 काचा घुसल्या होत्या – महिमा चौधरी

परदेस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपलं आगळं स्थान निर्माण करणाऱ्या महिमा चौधरीला कॅन्सर झाला आहे. अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवरून एका व्हीडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

या व्हीडिओत महिमा चौधरी सांगते की अनुपम खेर यांनी एका प्रोजेक्टमध्ये काम करायला त्यांना बोलावलं आणि मग महिमा चौधरींनी अनुपम खेर यांना तिच्या आजाराची माहिती दिली. हे सांगताना महिमा चौधरी भावूक झाली. अनुपम खेर यांनी महिमा चौधरींला कॅन्सरशी लढणारी हिरो म्हटलंय.

1999 मध्ये प्रकाश झा यांच्या 'दिल क्या करे' या चित्रपटात ती काम करत होती. तेव्हा ती बंगळूरूला होती. एक दिवस शूटिंगला जाताना एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. ती इतकी जोरदार होती की कारच्या काचा फुटून तिच्या चेहऱ्यात घुसल्या. ती जिवंत राहील की नाही अशी परिस्थिती होती.

 एका मुलाखतीत तिने सांगितलं की, "हा अपघात झाल्यानंतर कोणीही हॉस्पिटलमध्ये नेत नव्हतं. कसंबसं ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेव्हा तिथे अजय देवगण आणि तिची आई आले. जेव्हा तिने आरशात बघण्यासाठी चेहरा पाहिला तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. तिच्या चेहराभर टाके होते. जेव्हा डॉक्टरांनी सर्जरी केली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काचेचे 67 तुकडे होते."

या अपघातानंतर तिला स्वत:कडे प्रचंड लक्ष द्यावं लागलं. तिला सूर्यप्रकाशात येण्यासाठी मनाई होती. तिच्या खोलीत अंधार असायचा. याचं कारण असं की तिच्या चेहऱ्यावर उजेड, UV किरणं येऊ नयेत याची खबरदारी तिला घ्यावी लागली. तिचा चेहराही अनेक दिवस ती पाहत नव्हती.

जेव्हा हा अपघात झाला तेव्हा तिच्याकडे अनेक मोठे चित्रपट होते. तिचा चेहरा खराब झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. या अपघाताने ती पूर्ण खचली. तरी तिने धीर सोडला नाही. या आघातातून सावरायला तिला खूप वेळ लागला.

अपघातानंतर अजय देवगणने महिमाची साथ सोडली नाही. अजय तिला भेटायला जात असे. अजय देवगणने तिला त्याच्या एका चित्रपटात कामंही दिलं. मात्र तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. मग महिमाने चित्रपट क्षेत्रातून संन्यासच घेतला.

आता कॅन्सरच्या रुपात तिच्यावर आणखी संकट आलं आहे. या संकटालाही ती नक्कीच तोंड देईल.