नेटफ्लिक्सवरील पाच सर्वात भयानक चित्रपट, जे पाहून तुमची झोप उडेल !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नेटफ्लिक्सवरील पाच सर्वात भयानक चित्रपट, जे पाहून तुमची झोप उडेल !
मुंबई - 

चित्रपट रसिकांना भूत, आत्मे, आत्म्याचे जग दाखवणारे चित्रपट पाहायला आवडतात. असे अनेक चित्रपट आले आणि गेले ज्यांनी सत्य घटनांवर आधारित काल्पनिक कथांनी लोकांना घाबरवून सोडले. हे चित्रपट पाहून लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला. आज आम्ही तुम्हाला नेटफ्लिक्सवरील अशाच पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. हे पाहून तुमची झोप तर उडेलच, पण प्रत्येक क्षणी तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असे वाटू लागेल. हे चित्रपट तुमच्या मनात भीती निर्माण करतील. चला जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल.

१. द नन 
इतिहासातही भूतांशी संबंधित अशा अनेक घटना आहेत, ज्या आजही लोकांना घाबरवतात. अशाच एका घटनेवर 'द नन' बनवला आहे. 'द नन' हा चित्रपट एका चर्चच्या भुताटकी ननवर बनलेला चित्रपट आहे. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की वॅलेक नावाचा एक अतिशय शक्तिशाली आणि धोकादायक आत्मा एका ननमध्ये प्रवेश करतो. ज्यानंतर भीती आणि मृत्यूचा तांडव सुरू होतो.

२. द इव्हील डेड 
'द इव्हिल डेड' हा चित्रपट 5 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आधारित आहे. जे जंगल अडव्हेंचरसाठी जातात, जिथे त्यांना एक पुस्तक 'बुक ऑफ द डेड' सापडते. या पुस्तकाचे रहस्य माहीत नसलेले पाच विद्यार्थी ते वाचून आत्मे जागृत करतात.

३. अंडर द शॅडो 
हा चित्रपट शिदेह नावाच्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर आधारित आहे. 1980 मध्ये इराण-इराक युद्धादरम्यान शिदेहचा नवरा घर सोडून युद्धावर जातो. अशा परिस्थितीत शिदेह ही आपली मुलगी डोरसासोबत घरात एकटीच राहते. एके दिवशी तिला कळते की तिच्या मुलीवर आत्म्याचे सावट आहे. आपल्या मुलीला भुतापासून वाचवण्यासाठी एक आई चित्रपटात काय करते हे पाहण्यासारखे आहे.

४. द ब्लॅककोट्स डॉटर
हा चित्रपट एका शालेय विद्यार्थ्याची कथा आहे जो एका वेगळ्या शाळेत पोहोचतो. दरम्यान त्यांच्यासोबत भयानक घटना घडतात. चित्रपट संपेपर्यंत लोकांना भीतीचा सामना करावा लागणार आहे.
 
५. जैसाबेला 
नेटफ्लिक्स हॉरर चित्रपटांच्या यादीत 'जैसाबेला' हा चित्रपट विसरता येणार नाही. या चित्रपटात वारंवार भयाची अनुभूती येते. आहे. यामध्ये आत्म्याच्या अशा घटना दाखविण्यात आल्या आहेत, ज्यांना पाहून तुम्ही भीतीने गारठून जाल.