पुण्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

      पुणे , (प्रबोधन न्यूज )   -      गेल्या  दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आता पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात शिवाजीनगर परिसरात ११ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर ढमढरेमध्ये ११.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पाषाण परिसरात ११.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर लोणावळ्यात ९३.५ आणि लवासामध्ये ५३.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.