भाजपकडून विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी खोतांना उमेदवारी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपकडून विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी खोतांना उमेदवारी

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - उद्याची राज्यसभा निवडणूक आटोपल्यानंतर अवघ्या १० दिवसांनी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. भाजपकडून सहा उमेदवार उभे केले जाणार आहेत. भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ यांना संधी मिळणार आहे. भाजपचे चार उमेदवार हमखास निवडून येणार आहेत. असे असताना पाचवा आणि सहावा उमेदवार फडणवीस कसे निवडून आणणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने प्रत्येकी दोन उमेदवारांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये भाजपा नेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पाचवी जागा उमा खापरे लढवणार आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप सहावी जागा लढवणार असल्याचं सांगितलं आणि चुरस आणखी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना मुंबईला पोहचण्याचे आदेश दिले असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ यांना संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज उमा खापरे यांच्यासोबत ते विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपकडे ११३ मते आहेत. त्यामुळे २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर काँग्रेसची ४४ मते असून २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला १० मतांची गरज भासणार आहे.