पब्जी खेळू न दिल्याने मुलाने आईला गोळ्या घातल्या, तीन दिवस मृतदेह लपवून ठेवला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
लखनौ, (प्रबोधन न्यूज) – शिर्षक वाचून ही घटना परदेशात घडली असावी असे वाटू शकेल, पण तसे नाहीये. ही घटना चक्क भारतात तीही योगींच्या उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये घडली आहे. लखनऊच्या पीजीआय कोतवाली भागातील यमुनापुरम कॉलनीमध्ये शनिवारी रात्री लष्करातील अधिकाऱ्याच्या मुलाने आईची गोळ्या झाडून हत्या केली. मुलगा आणि मुलीने ही घटना दोन दिवस इतरांपासून लपवून ठेवली. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याने शेवटी मुलाने सोमवारी रात्री उशिरा वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता PUBG गेम खेळण्यास नकार दिल्याने आपण आईवर गोळी झाडल्याचे पोलिसांना त्याने सांगितले.
पंचमखेडा यमुनापुरम येथील रहिवासी नवीन सिंग हे पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे सैन्यात जेसीओ पदावर कार्यरत आहेत. पत्नी साधना सिंग (वय 35) या तिच्या 16 वर्षाच्या मुलासह आणि 10 वर्षाच्या मुलीसोबत लखनौमध्ये राहत होत्या. एसीपी कँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास नवीन सिंग यांनी फोन करून पत्नीची हत्या झाल्याचे आणि मुलांना डांबून ठेवले असल्याची माहिती दिली. पोलिसांनी मुलगा आणि मुलीची चौकशी केली असता मुलाने खुनाची कबुली दिली.
यमुना विहार कॉलनीची घटना हादरवून टाकणारी आहे. घरात आईचा मृतदेह पडला होता आणि मुलाने मित्रांना बोलावून पार्टी केली. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला कसलाही पश्चाताप झाला नव्हता आणि भीतीही नव्हती. स्वतः मित्रांना फोन करून घरी बोलावले. ऑनलाइन जेवण ऑर्डर केले आणि pubg गेम खेळत बसला. पोलिसांच्या चौकशीत हा खुलासा समोर आला आहे.
एडीसीपी कासिम अब्बास यांनी सांगितले की, जेव्हा पोलिसांनी मुलांकडे नक्की काय झाले असे विचारले असता त्याने सांगितले की, आकाश नावाचा इलेक्ट्रिशियन छतावरून आला होता. आकाशने रविवारी आईवर गोळी झाडली व आम्हाला खोलीत बंद केले होते. कसेबसे दुसऱ्या दिवशी सुटका झाल्यावर मी वडिलांना फोनवर याची माहिती दिली. पोलिसांनी मुलगा आणि मुलीची चौकशी केली असता भलतीच गोष्ट समोर आली. मुलीने सर्व हकीकत सांगितली. भावानेच गोळी झाडल्याचे सांगितले.
एडीसीपीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री आईची हत्या केल्यानंतर मुलाने खोलीला बाहेरून कुलूप लावले होते. धाकट्या बहिणीला आधीच धमकी देऊन गप्प केले होते. आईचा मृतदेह खोलीत पडल्यानंतरही मुलाने मित्रांना फोन करून घरी बोलावले. ऑनलाइन अॅपद्वारे जेवणाची ऑर्डर दिली. मित्रांसोबत पार्टी केली. गाणी वाजवली काही वेळ मित्रांसोबत खेळायला गेले.
एडीसीपीने सांगितले की, नवीन सिंह हा लष्करी अधिकारी मूळचा वाराणसीचा आहे. मुलांना शिक्षणासाठी लखनौला हलवण्यात आले होते. ही मुले यमुना विहारमध्ये आईसोबत शिकत होती. चुकीच्या संगतीमुळे मुलाच्या हातून हे कृत्य घडले असावे.
साधना यांच्या दहा वर्षांच्या मुलीने पोलिसांना सांगितले की, ती शनिवारी रात्री आईसोबत झोपली होती. त्यानंतर गोळीबाराचा आवाज आला. ती उठून बसली. समोर भाऊ हातात पिस्तुल घेऊन उभा होता. आई पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. भाऊ मला उचलून घेऊन दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. ही घटना कोणाला सांगितल्यास तुलाही मारून टाकीन, अशी धमकी दिली. ती दोन दिवस रडत होती. दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले, तेव्हा भैय्याने वडिलांना सांगितले.
चौकशीत मुलाने सांगितले की, शनिवारी आई खोलीत दहा हजार रुपये ठेवण्यास विसरली होती. मी रुपये घेतले नाहीत. तरीही मला मारहाण करण्यात आली. त्यामुळे मी आईवर मी रागावलो होतो. रात्री दोनच्या सुमारास मी वडिलांचे पिस्तूल घेऊन आईच्या खोलीत पोहोचलो व आईच्या डोक्यात गोळी झाडली. मुलाची कहाणी ऐकून पोलीसही चक्रावून गेले.