बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार
बिहार राज्य आता स्वतःबरोबरच देशालाही मालामाल करणार

पटणा, दि. 31 मे – बिहार राज्य मागासलेले राज्य, गरीब राज्य, अशिक्षित राज्य, प्रचंड बेरोजगारी ही विशेषणे आता बाजूला सारली जाऊन एक श्रीमंत राज्य म्हणून उदयास येणार आहे. एकदा का श्रीमंती आली की बिहारमधील सर्व समस्या दूर होतील. ही किमया करणार आहे बिहारमध्ये सापडलेली सोन्याची खाण. देशात जेवढे सोने आहे त्याच्या 44 टक्के सोने बिहारमधील एका खाणीत लपले आहे. आता ते सोने बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या खाणीत इतकं सोने आहे की कितीही खोदलं तरी सोनच निघत आहे. बिहारच नाही तर देशही मालामाल होईल इतके सोने या खाणीत दडलंय.

बिहारमधल्या जमुई जिल्ह्यातून सोनं काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ही भारतामधील सर्वात मोठी सोन्याची खाण असेल. या खाणीतून सोनं बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार करणार आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जमुई जिल्ह्यात २२२.८८ मिलियन टन सोन्याचं भांडार आहे. जमुईच्या जमिनीतून सोनं काढण्यासाठी खाण आणि भूवैज्ञानिक विभाग आणि राष्ट्रीय खनिज विकास निगमसह आणखी काही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.

जीएसआयला मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो या भागांमध्ये सोनं असल्याची माहिती मिळाली आहे, असं अतिरिक्त मुख्य सचिव आणि खाण आयुक्त हरज्योत कौर बम्हरा यांनी दिली आहे.

पुढील महिन्याभरात राज्य सरकारकडून या भागांमध्ये सोन्याचा प्राथमिक शोध सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थेशी व अन्य काही संस्थांशी सामंजस्यपूर्ण करार करून, काही भागांत सामान्य स्तरावरही शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे असं हरज्योत कौर यांनी सांगितलं.

बिहार राज्यात देशातील सर्वाधिक सोन्याच्या खाणी असल्याची माहिती केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभा अधिवेशनातच दिली होती. भारत देशात एकूण जेवढं सोनं आहे त्या सोन्याच्या तुलनेत 44 टक्के सोनं हे एकट्या बिहार राज्यामध्ये असल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी लेखी स्वरुपात दिली होती. त्यामुळे या खाणकामात सोनं सापडलं तर आपल्या देशात नक्कीच सोन्याचे दिवस येतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे सोन्याची आवड असणाऱ्यांना सोनं खरेदी करणं शक्य होईल. जर सोन्याच्या खाणीचे खोदकाम पूर्ण झाले तर या पुढे भारतीयांना सोनं घेणं किंवा सोन्याचे दागिने तयार करणं शक्य होईल.