भाजपने तिसरा उमेदवार उतरवल्याने निवडणूक होणार रंजक; अपक्ष गेमचेंजर ठरणार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाजपने तिसरा उमेदवार उतरवल्याने निवडणूक होणार रंजक; अपक्ष गेमचेंजर ठरणार

मुंबई, दि. 30 मे - भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. रविवारी रात्री उशिरा दिल्लीतून महाडिक यांचे नाव जाहीर झाले. यापूर्वी भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली होती. यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नावाचा समावेश होता. महाडिक यांचे नाव घोषित झाल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे.

कोल्हापूरचे संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देऊन शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. म्हणूनच भाजपानेही कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना तिसरे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.  विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. भाजपाचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत. भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी 12 मते कमी पडत आहेत.

आठ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून केला जातो. भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयाकरिता १२ मतांची आवश्यकता आहे. अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या मतांच्या आधारे मतांची जुळवाजुळव करण्यावर भाजपाचा भर आहे. भाजपाच्या तिसऱ्या उमेदवारामुळे शिवसेनेपुढे दुसरा उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. कारण शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची सारी मदार ही स्वत: व राष्ट्रवादीची अतिरिक्त मते तसेच अपक्षांवर आहे. अपक्षांची मते भाजपाकडे गेल्यास शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचे भवितव्य कठीण असेल.

सहावी जागा लढवण्यासाठी लागणारी आकडेमोड महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर शिवसेना आपली जागा निवडून आणणार आहे. परंतु तिन्ही पक्षांचा एक-एक उमेदवार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीकडे 26 मतं उरतात त्यामुळे उरलेल्या मतांसाठी त्यांना अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. अपक्षांनी साथ दिल्यास सहावी जागा महाविकास आघाडी सहज निवडून आणू शकते. सहाव्या जागेचे भवितव्य अपक्षांच्या हाती असणार आहे. त्यामुळे घोडेबाजार होणार हे गृहित धरले जात आहे.