यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर काश्मिर खोऱ्यात परिस्थिती चिघळली
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
श्रीनगर, दि. 25 मे - दिल्लीच्या विशेष NIA कोर्टाने यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दुसरीकडे, शिक्षेची घोषणा होताच जम्मू-काश्मीरमधील बिघडलेली परिस्थिती पाहता श्रीनगरमधील मैसुमा आणि डाउनटाऊन भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी, श्रीनगरमधील मैसुमा भागात काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक यांच्या समर्थकांमध्ये आणि जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
दिल्लीतील एका न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५०० रुपये दंड ठोठावला. मात्र, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या निर्णयानंतर श्रीनगरमधील मैसुमा आणि डाउनटाउन भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, यासिन मलिकला दहशतवादी फंडिंग प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत सर्व आरोपांसाठी दोषी ठरवले होते. मलिकवर UAPA ची कलम 18 (दहशतवादी कृत्ये करण्याचा कट), 20 (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे) आणि कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) चे आरोप ठेवण्यात आले होते.
19 मे रोजी विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर बुधवारी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.