जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या, शरद पवारांची केंद्राकडे मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या, शरद पवारांची केंद्राकडे मागणी

मुंबई, दि. 25 मे - केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी, सत्य काय ते सर्वांच्या समोर येऊ द्या, अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राला केली आहे. तसेच, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आज मुंबईत राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षण राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्रावर सडकून टीका केली.

पवार म्हणाले, ''ओबीसी आरक्षण हेच आमचे लक्ष्य असून ती आमची भूमिका आहे. देशात अस्वस्थता आणण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.'' असेही पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले की, ''राजकीय आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका नको अशी भूमिका राष्ट्रवादीची असून महाविकास आघाडी सरकारमधील नेतेही याच भूमिकेसोबत असतील अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.समाजाची उपेक्षा टाळण्यासाठी आरक्षण द्यायलाच हवे.''

"अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात की, यांची नेमकी लोकसंख्या किती? त्यासाठी काय करायचं? तेवढी लोकसंख्या आहे की नाही? अशी शंका उपस्थित करतात. मला आनंद आहे, की तुम्ही या परिषदेत एक याचिका मान्य केली. केंद्र सरकारने ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा कळू द्या देशाला की नक्की काय शंका आहे. सत्य काय ते समोर येऊ द्या. पण, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही", असं शरद पवार म्हणाले.