टेक्सासमधील शाळेत युवकाने केला अंधाधुंद गोळीबार; १८ विद्यार्थी, तीन शिक्षकांचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

टेक्सासमधील शाळेत युवकाने केला अंधाधुंद गोळीबार; १८ विद्यार्थी, तीन शिक्षकांचा मृत्यू
टेक्सासमधील शाळेत युवकाने केला अंधाधुंद गोळीबार; १८ विद्यार्थी, तीन शिक्षकांचा मृत्यू

टेक्सास, दि. २५ मे - अमेरिकेच्या टेक्सासमध्ये  मृत्यूचा थरार पाहायला मिळाला आहे. टेक्सासमधील एका प्राथमिक विद्यालयात काल दुपारी  एका 18 वर्षीय शूटरने अंदाधुंद गोळीबार केला. शूटरने इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना लक्ष्य केलं आहे.

या गोळीबारात 18 विद्यार्थी आणि तीन शिक्षकासह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण शाळेत रक्ताचे सडे पसरले आहेत. त्यामुळे एकच टेक्सासमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी शाळेत धाव घेऊन एकच आक्रोश केला आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोराला शरण येण्यास सांगितले. मात्र, हल्लेखोराने उलट गोळीबार केला. यावेळी हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. टेक्सासच्या उवाल्डे शहरात ही घटना झाल्याचं एबॉट यांनी सांगितलं. हे एक छोटसं शहर आहे. या शहराची लोकसंख्या 20 हजाराच्या आसपास आहे.

दुपारी ही घटना घडली. हा शूटर अचानक स्कूल कँम्पसमध्ये घुसला आणि त्याने अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. पोलिसांना या शूटर्सबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आईवडील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांना कँम्पसमध्ये येण्यास मनाई करण्यात आले आहे.

हा हल्ला अत्यंत घातक होता, असं एबॉट यांनी सांगितलं. उवाल्डे हे अत्यंत छोटं शहर आहे. हा भ्याड हल्ला होता, असं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. या शाळेत एकूण 600 विद्यार्थी शिकतात.